Crime : नगर : अहिल्यानगर, जामखेड नंतर संगमनेर शहरात पोलीस (Police) विशेष पथकाने मटका बुकींवर छापा टाकून ३५ आरोपींविरोधात कारवाई (Action) केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १० लाख ४६ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : ‘आळंदीमध्ये कत्तलखाना होऊ देणार नाही’ – देवेंद्र फडणवीस
संशयित आरोपींचे नावे
शंकर भागप्पा इटप, दत्तात्रय भागंप्पा इटप, नानासाहेब बापू जाधव, सूरज रामसिंग ताम्रकर, आण्णासाहेब कुंडलिक खताळ, रवींद्र नंदराम फासे, हौशीराम रामभाऊ कहांडाळ, इकबाल बशीर शेख, शेखर भास्कर जाधव, नानासाहेब भीमराज उकीर्डे, रामदास गणपत माळी, कैलास बाबुराव जाधव, शिवाजी दत्तू सातपुते, राजू रामनाथ झांबरे, मधुकर नामदेव भोर, बाळासाहेब कारभारी पवार, भाऊसाहेब नाना काळे, शंकर संजय सवारगे, रमेश बाबुरावर सरोदे, दगडू रामचंद्र पवार, दत्तू तुकाराम अनाप, अस्लम सुलतान शेख, हरिभाऊ बबन पवार, मनोहर काशिनाथ अभंग, संभाजी किसन साळवे, सुदर्शन दत्तात्रय इटप, सोमनाथ शंकर यादव, विश्वनाथ नाना आल्हाट, सुभाष सीताराम खैरे, अशरफ समशेद सय्यद, हसनेन रौफ पटेल, रियाज बाबू मियाँ देशमुख, नजाकत समशेद अली सय्यद, साहिल अशरफ जहांगीरदार, आयान साजिद सय्यद (सर्व रा. संगमनेर, ता. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत.
अवश्य वाचा : माळीवाडा बस स्थानकात प्रवाशांची गैरसोय; प्रशासनाचे दुर्लक्ष
एकूण १० लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Crime)
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थापना केलेल्या विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरात तेलीखुंट परिसरात मटका जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मटका जुगार खेळण्याचे साहित्य, दुचाकी असा एकूण १० लाख ४६ हजार ३१० रुपायांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, शंकर चौधरी, अजय साठे, अरविंद भिंगारदिवे, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनील पवार, सुनील दिघे, अमोल कांबळे, जालिंदर दहिफळे यांच्या पथकाने केली.