Crime : श्रीरामपूरमध्ये बेकरीत गोमांस पकडले; एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल

Crime : श्रीरामपूरमध्ये बेकरीत गोमांस पकडले; एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल

0
Crime : श्रीरामपूरमध्ये बेकरीत गोमांस पकडले; एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल
Crime : श्रीरामपूरमध्ये बेकरीत गोमांस पकडले; एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल

Crime : श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील बाजार वेस जवळ असलेल्या उर्दू शाळेच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये आणि बेकरीत गोवंश जातीच्या जनावराचे मांस विकले जात असल्याची माहिती बजरंग दल (Bajrang Dal) तसेच गोरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसह (Police) छापा टाकला असता उर्दू शाळेच्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये शकील आयुब कुरेशी हा जनावराचे मांस विक्री करताना आढळला. तसेच शेजारी असलेल्या बेकरीमध्येही गोमांस सापडले. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

नक्की वाचा : चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ;वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली

जनावरांचे मांस विकत असल्याचे आले निदर्शनास

बेलापूर येथील ऋषिकेश बारहाते, अतुल थोरात (उक्कलगाव), संकेत खर्डे (दिनेश राकेचा, कोल्हार), रावसाहेब आमोलिक (वळदगाव), रोहित शिंदे (बेलापूर) हे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना बेलापूर येथील उर्दू शाळेच्या पाठीमागे एक इसम गोमांस विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हे सर्व विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते सदर ठिकाणी गेले असता शकील आयुब कुरेशी (कुरेशी मोहल्ला, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर) हा इसम जनावरांचे मांस विकत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी बेलापूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे, संपत बडे, भारत तमनर आदींनी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला.

अवश्य वाचा : वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये कुठलीही कमतरता भासू देणार नाही – सभापती राम शिंदे

एकूण ५० किलो गोमांस जप्त (Crime)

उर्दू शाळेच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शकील कुरेशी हा जनावरांचे मांस विकत असल्याचे दिसले. तसेच शेजारी असलेल्या युसुफ अन्वर शेख यांच्या मालकीच्या बेकरीमध्ये गोवंश जातीचे जनावराचे मांस आढळून आले. बेलापूर पोलिसांनी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला पाचारण करून हे मांस गोमांस आहे की नाही याबाबत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी युसुफ अन्वर शेख यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये आयुब कुरेशी विकत असलेले तसेच युसुफ अन्वर शेख यांच्या बेकरीमध्ये ठेवलेले गोमांस असे एकूण ५० किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले आहे.