Crime : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; गुन्हा दाखल

Crime : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; गुन्हा दाखल

0
Crime : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; गुन्हा दाखल
Crime : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; गुन्हा दाखल

Crime : नगर : केडगाव येथील एका कोचिंग क्लास मधील शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत लज्जा उत्पन्न (Abuse) होईल, असे वर्तन केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पीडिताने कोतवाली पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद (Complaint) दाखल केली आहे. विकास कोटकर (रा. केडगाव), असे गुन्हा (Crime) दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत विविध पदांसाठी भरती

शिक्षकाकडून त्रासदायक व लज्जास्पद वर्तन

विद्यार्थिनी गेल्या वर्षभरापासून केडगाव येथील कोचिंग क्लासेसमध्ये शिकण्यासाठी जात होती. ५ जून रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षकाने तिला व तिच्या काही मित्र-मैत्रिणींना पार्टीसाठी नेले. या दरम्यान, डोंगराजवळ गाडी थांबवून शिक्षकाने तिला ‘तु मला खूप आवडते, तू माझ्या पहिलया गर्लफ्रेंडसारखी आहेस, असे म्हणत त्रासदायक व लज्जास्पद वर्तन केले, असा आरोप केला आहे.

अवश्य वाचा : बनावट कागदपत्रे तयार करून लाटली शिष्यवृती; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

आईने सोडवले मुलीला (Crime)

या प्रकारानंतर विद्यार्थिनीने घाबरून कोणाला काही न सांगता शिक्षण सुरू ठेवले. मात्र, सोमवार (ता. ७)  रोजी रात्री क्लास संपल्यानंतर ती आणि तिची मावस बहिण अभ्यास करत असताना, शिक्षकाने तिला जवळ बोलावून मिठी मारली, असा आरोप तिने केला आहे. त्यावेळी तिची आई घटनास्थळी पोहोचली व तिने मुलीला त्याच्या तावडीतून सोडवले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे करीत आहेत.