Crime : तरूणावर चॉपरने हल्ला; गुन्हा दाखल

Crime : तरूणावर चॉपरने हल्ला; गुन्हा दाखल

0
Crime : तरूणावर चॉपरने हल्ला; गुन्हा दाखल
Crime : तरूणावर चॉपरने हल्ला; गुन्हा दाखल

Crime : नगर : केडगाव बायपास येथील एका हॉटेलमध्ये मित्राच्या वाढदिवसानिमित्त जेवणासाठी गेलेल्या तरूणावर किरकोळ वादातून चॉपरने हल्ला करून जखमी (Injured in Attack) करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Police Station) तिघांविरूध्द गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार

आपली चेष्टा चालू असल्याचा गैरसमजातून वाद

सागर कोंढुळे, श्रवण काळे व निलेश पंडुळकर (पुर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जयेश दत्तात्रय देवकर (वय २५, रा. लोंढेमळा, सोनेवाडी रस्ता, केडगाव) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्याचे मित्र ओम अजय पोटे, अभिषेक विठ्ठल देशमुख, सुशांत सुखदेव विधाते, व विशाल बापू गोसावी हे ओम पोटे याच्या वाढदिवसानिमित्त जेवणासाठी अण्णाचा ढाबा येथे गेले होते. तेथे जेवताना गप्पा आणि हशा सुरू होता. मात्र, शेजारच्या टेबलावर बसलेल्या तिघांना आपली चेष्टा चालू असल्याचा गैरसमज झाला.

अवश्य वाचा : २९१ कोटीचा घोटाळा प्रकरणी अर्बन बँकेची ‘ईडी’कडून होणार चौकशी..!

चॉपरसारख्या हत्याराने त्याच्या छातीवर वार (Crime)

या वादावर समजावून सांगितल्यावरही जेवणानंतर हॉटेलबाहेर जयेश गेला असता, त्या तिघांनी पाठलाग करत जयेश याच्यावर हल्ला चढवला. यातील एकाने चॉपरसारख्या हत्याराने त्याच्या छातीवर वार केला, तर अन्य दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.