Crime : जिल्ह्यात खाकीचा धाक झाला कमी; हातात दांडे, गजाने मारहाण

Crime : जिल्ह्यात खाकीचा धाक झाला कमी; हातात दांडे, गजाने मारहाण

0
Crime : जिल्ह्यात खाकीचा धाक झाला कमी; हातात दांडे, गजाने मारहाण
Crime : जिल्ह्यात खाकीचा धाक झाला कमी; हातात दांडे, गजाने मारहाण

Crime : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात खाकीचा दबदबा कमी झाला आहे. चोरी, टोळी हल्ले, खून व इतर गंभीर गुन्ह्यांची (Crime) घटना सतत वाढत आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी कायदा सुव्यवस्था (Law and Order) अबाधित राहण्यासाठी ठोस पाऊले उचलविली पाहिजेत.

नक्की वाचा : धुळ्यात राडा;माणिकराव कोकाटेंच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

घटनेचा सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज समोर

काल (ता. २४) झालेल्या दिल्लीगेट परिसरातील घटनेचा सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज समोर आले आहे. हातात दांडे, लोखंडी गजाने महिलांना, तसेच पुरुषांना अमानुष मारहाण करताना दिसत आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करून खाकीचा धाक गुन्हेगारामध्ये राहिला पाहिजॆ यासाठी ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Crime : जिल्ह्यात खाकीचा धाक झाला कमी; हातात दांडे, गजाने मारहाण
Crime : जिल्ह्यात खाकीचा धाक झाला कमी; हातात दांडे, गजाने मारहाण

अवश्य वाचा : कर्जत तालुका प्रशासनाने राशीन प्रकरणात सर्वसमावेशक तोडगा काढला

चोरी, दरोडा, दुचाकीच्या चोऱ्या, टोळी युद्धाच्या घंटानामध्ये वाढ (Crime)

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात चोरी, दरोडा, दुचाकीच्या चोऱ्या, घरफोडी, टोळी युद्धाच्या घंटानामध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरात १५ ते २० जणांच्या टोळक्याने एका दुकानाची तोडफोड करून मारहाण केली होती. त्यातील गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले होते. तसेच तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत मुलाचे अपहरण करून त्याचा खून करून त्याला जाळण्याचा प्रकार घडला होता. ही घटनाही टोळी युद्धातून घडली होती. आता पुन्हा असाच प्रकार तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत घडला असून १० ते १५ जणांच्या टोळक्याने हाताद लाकडी दांडे व लोखंडीगज घेऊन दहशत करत मारहाण केली. तसेच परिसरातील घराची दुकानाची तसेच वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

गुन्हेगारीत वाढ; पोलीस मनुष्यबळ अपुरे!

मुंबईनंतर अहिल्यानगर राज्यातील गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी सरासरी १७ हजार गंभीर गुन्हे दाखल होत असून, पोलीस कर्मचारी अत्यंत कमी असल्याने एक कर्मचाऱ्याकडे २०–२५ गुन्हे तपासासाठी येतात, ज्यामुळे कार्यक्षमता खालावते आहे. त्यामुळे संबंधित विभागाने मनुष्यबळ उभे करून कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.