Crime : शेवगाव: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार (Abusing a girl) करणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी पाठलाग करून धुळे येथे जेरबंद केले. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता.
नक्की वाचा : पाथर्डीत जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाचा छापा; ११ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पीडितेच्या फिर्यादीत म्हटले आहे की,
२ जुलै रोजी सायंकाळी आरोपी आण्णासाहेब उर्फ तान्हाजी प्रल्हाद आंधळे (रा. सोनेसांगवी, ता. शेवगाव) याने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून धमकावत सुनिता आंधळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत आळंदी (जि. पुणे) येथे नेले. तिथे आरोपीने पीडितेला कैद करून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सतत वास्तव्य बदलत राहिला.
अवश्य वाचा : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती
मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत (Crime)
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून आरोपीच्या शोधाला सुरुवात केली. आरोपी पुणे, अहिल्यानगर, जालना, संभाजीनगर अशा ठिकाणी लपून राहत होता. २६ जुलै रोजी गुप्त बातमीदाराकडून आरोपी धुळे जिल्ह्यातून मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. शेवगाव पोलिसांनी धुळे पोलिसांच्या मदतीने २७ जुलै रोजी आरोपीला धुळे जिल्ह्यातून ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोसई बाजीराव सानप, रामहरी खेडकर, पोका भगवान सानप, शाम गुंजाळ, संपत खेडकर, ईश्वर बेरड, राजु बढे, सचिन पिरगळ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे राहुल गुड्ड यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे करीत आहेत.