Crime : तलाठी असल्याचे सांगून महिलेची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Crime : तलाठी असल्याचे सांगून महिलेची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Crime : तलाठी असल्याचे सांगून महिलेची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime : तलाठी असल्याचे सांगून महिलेची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Crime : नगर : मी तलाठी आहे, तुमचे संजय गांधी निराधार योजनेचे (Sanjay Gandhi Yojana) बंद झालेलं खाते मी पुन्हा सुरु करतो, असे सांगून एका अनोळखी व्यक्तीने एका वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करुन सोन्याचे दागिने फसवून चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल (Crime filed) करण्यात आला आहे. ही घटना नगर-पुणे रोड (Nagar-Pune Road) वरील केडगाव येथे घडली.

नक्की वाचा : भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत

फिर्यादींचा विश्वास केला संपादन

आशाबाई बापू काळे (वय ५५, रा. जिल्हा परिषद शाळेसमोर, खडकी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या केडगाव येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्या होत्या. डॉक्टरांनी तुमचा नंबर दुपारी १ वाजेपर्यंत येईल, असे सांगितल्याने त्या दोघी बाहेर बसल्या होत्या. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन मी तलाठी आहे, तुमच्या गावातील खूप लोक माझ्या ओळखीचे आहेत. तुमचे संजय गांधी निराधार योजनेचे खाते बंद पडले आहे, ते मी सुरु करुन, पैसे काढून देतो. चला माझ्यासोबत अरणगावच्या बँकेत, असे सांगून त्याने फिर्यादींचा विश्वास संपादन केला.

अवश्य वाचा : पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध: विखे पाटील

४ ग्रॅमचे सोन्याचे वेल व ३ ग्रॅमचे घुंगराचे डूल घेऊन पसार (Crime)

फिर्यादी त्याच्या दुचाकीवर बसून त्याच्यासोबत निघाल्या. त्याने केडगाव ते अरणगाव रस्त्याने अरणगाव रेल्वे ब्रिज बोगद्याजवळ मेहेर बाबा गेट समोर आल्यानंतर त्याने खाते सुरु करायचे असल्यास खर्च येतो, असे म्हटले. यावर फिर्यादी यांनी आता माझ्याकडे पैसे नाही, असे सांगितले. त्यावर त्या व्यक्तीने कानातले दागिने माझ्याकडे द्या, खाते सुरु झाल्यावर दागिने परत घेऊन जा. असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी त्याला ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल व ३ ग्रॅमचे घुंगराचे डूल दिले. मात्र, इसमाने त्यानंतर फिर्यादी महिलेस कोणत्याही बँकेत न घेता थेट अरणगाव येथे सोडून पसार झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.