Crime : रेल्वे स्टेशन परिसरात युवकार कोयत्याने हल्ला; तीन जणांविरोधात गुन्हा

Crime : रेल्वे स्टेशन परिसरात युवकार कोयत्याने हल्ला; तीन जणांविरोधात गुन्हा

0
Crime : रेल्वे स्टेशन परिसरात युवकार कोयत्याने हल्ला; तीन जणांविरोधात गुन्हा
Crime : रेल्वे स्टेशन परिसरात युवकार कोयत्याने हल्ला; तीन जणांविरोधात गुन्हा

Crime : नगर : रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का येथे काम करणाऱ्या तरूणावर रविवारी (ता. ३) कोयत्याने हल्ला (Attack) केल्याची घटना समोर आली आहे. लखन बबन पेटारे (वय २८ रा. रेल्वे स्टेशन, आदर्श गौतमनगर, अहिल्यानगर) असे जखमी तरूणाचे नाव असून त्यांच्यावर सध्या कायनेटिक चौकातील (Kinetic Chowk) एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे (Crime)

पंडीत सुखदेव खुडे, सनी पंडीत खुडे व पुजा पंडीत खुडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी हे कामाच्या ठिकाणी ओळखीच्या व्यक्तीशी बोलत असताना अचानक त्यांचे नातेवाईक पंडित खुडे हा तेथे येऊन त्यांना शिवीगाळ करू लागला. पेटारे यांनी विरोध करताच खुडे याने त्यांना धमकी देत तुला दाखवतोच, असे म्हणत त्याचा मुलगा सनी खुडे व पत्नी पूजा खुडे यांना येथून बोलावून घेतले. नगर-दौंड रस्ता, सुभद्रानगर येथून दुचाकीवरून आलेल्या या दोघांनी पेटारे यांना पुन्हा एकदा दमबाजी व शिवीगाळ करत कोयत्याने वार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.