Crime : नगर : शेवगाव येथे तीन महिन्यांपूर्वी कापड कारखान्यातील व्यवस्थापकाला लुटण्यात (Crime) आले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने चेतन प्रमोद तुजारे (वय १९, रा. वरुर, ता. शेवगाव) व समाधान विठ्ठल तुजारे (वय २०, रा. वरुर, ता. शेवगाव) या आरोपींना जेरबंद (Accused jailed) केले. त्यांच्याकडून १० लाख रुपये हस्तगत करण्यात आले.
हे देखील वाचा: मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित; मनोज जरांगेंनी दिली माहिती
तलवारीचा धाक दाखवून लुटले
शेवगाव येथे कापड कारखान्यातील व्यवस्थापक विठ्ठल लक्ष्मण सोनवणे यांनी कारखान्याचा धनादेश बडोदा बँकेत दिला. त्या धनादेशाचे १० लाख रुपये त्यांच्याकडे होते. एक दुचाकीवर दोन जण आले त्यांनी सोनवणे यांना लाथ मारून खाली पाडले. त्यांना तलवारीचा धाक दाखवून पैसे असलेली बॅग ओढून नेली. या संदर्भात सोनवणे यांनी २९ डिसेंबर २०२३ रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
नक्की वाचा: बापरे ! पंतप्रधान मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स ?
आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत (Crime)
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली होती की, हा गुन्हा चेतन तुजारे याने केला आहे. त्यानुसार पथकाने चेतन व समाधान यांना आज ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचा साथीदार अर्जुन तुजारे (रा. वरुर, ता. शेवगाव) हा पसार आहे. पथकाने जेरबंद आरोपींकडून चोरलेले १० लाख रुपये व एक दुचाकी असा १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पथकाने जेरबंद आरोपींना पुढील तपासासाठी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.