Crime : नगर : स्वातंत्र्यवीर व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासह तमाम स्वातंत्र्यविरांचा अवमान करणाऱ्या समाजकंटक सागर बेग याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाने केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा
मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित (Crime)
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अथर खान, फारूक रंगरेज, समीर पठाण, आलतमश जरीवाला, संगीता खिलारी, सचिन नवगिरे, वैभव साळवे, वसीम शेख, कैफ शेख, अझहर खान, तुफेक पटेल, तौफेक शेख, शाहिद शेख, मोहसीन पठाण, सलमान बेलदार, रईस शेख, परवेज शेख, महेमूद पठाण, जाकीर शेख, रियाज कुरेशी, नईम शेख, ईक्काम तांबटकर, मोईज मेमन, खालेद तांबोळी, फय्याज तांबोळी, मोहसीन शेख, अनिस शेख, फिरोज शेख, अली शेख आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह पंतप्रधानांनाही हटवण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर
स्वातंत्र्यविरांचा एकेरी अपमानास्पद उल्लेख (Crime)
नालेगाव येथील भूमिपुत्र प्रतिष्ठान आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात (ता. १६) सागर बेग याने आपल्या भाषणात भारतरत्न, स्वातंत्र्यवीर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याविषयी अत्यंत खालच्या थराचे व अशोभनीय वक्तव्य केले व तो भारताचा पहिला शिक्षण मंत्री होता” असा एकेरी अपमानास्पद उल्लेख करून केवळ आझाद यांचाच नव्हे तर सर्वच स्वातंत्र्यविरांचा अपमान केला. सागर बेगवर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.