Crime : मोबाईल दुकानात चोरी; २ लाख १० हजारांचा ऐवज लंपास, गुन्हा दाखल

Crime : मोबाईल दुकानात चोरी; २ लाख १० हजारांचा ऐवज लंपास, गुन्हा दाखल

0
Crime : मोबाईल दुकानात चोरी; २ लाख १० हजारांचा ऐवज लंपास, गुन्हा दाखल
Crime : मोबाईल दुकानात चोरी; २ लाख १० हजारांचा ऐवज लंपास, गुन्हा दाखल

Crime : नगर : अहिल्यानगर शहरातील स्टेशन रस्ता परिसरात असलेल्या एस. एस. मोबाईल शॉपीमध्ये (S. S. Mobile Shopee) (ता. ३०) ऑक्टोबर रोजी पहाटे छताचे पत्रे उचकटून धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्याने दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली एक लाख २७ हजार ९०० रूपयांची रक्कम आणि एक नवीन आयफोन (iPhone) असा एकूण २ लाख १० हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे. चोरीचा (Theft) हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अवश्य वाचा : भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेबाबत दुकानाचे व्यवस्थापक रोहीत संजय आहेर (वय ३०, रा. गणेशनगर, शिवाजीनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. १) दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहीत आहेर हे ता. २९ ऑक्टोबर रोजी रात्री दुकान बंद करून गेले होते. त्यावेळी दिवसभराच्या विक्रीची १ लाख २७ हजार ९०० रूपयांची रोख रक्कम त्यांनी ड्रॉवरमध्ये ठेवली होती. दुसऱ्या दिवशी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता त्यांनी दुकान उघडले असता, त्यांना दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले व छताचे सिलिंगचे शीट तुटलेले दिसले. त्यांनी ड्रॉवर तपासले असता त्यातील रोकडा दिसली नाही.

नक्की वाचा : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

चोरट्याने छताचे पत्रे उचकटून दुकानात केला प्रवेश (Crime)

दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तोंडाला रूमाल बांधलेला एक अज्ञात व्यक्तीने छताचे पत्रे उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्याने दुकानातून एक लाख २७ हजार ९०० रूपये रोख, ६९ हजार ९०० रूपये किमतीचा आयफोन १६ आणि १२ हजार ८०० रूपये किमतीचे तीन नॉईज कंपनीचे एअर बड्स असा एकूण दोन लाख १० हजार ६०० रूपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.