Crime : दुरुस्तीसाठी लावलेल्या जेसीबीची चोरी; गुन्हा दाखल

Crime : दुरुस्तीसाठी लावलेल्या जेसीबीची चोरी; गुन्हा दाखल

0
Crime : दुरुस्तीसाठी लावलेल्या जेसीबीची चोरी; गुन्हा दाखल
Crime : दुरुस्तीसाठी लावलेल्या जेसीबीची चोरी; गुन्हा दाखल

Crime : नगर : वर्कशॉप मध्ये दुरूस्तीसाठी ठेवलेला सुमारे २७ लाख ५० हजार रूपये किमतीचा जेसीबी (JCB) व एक लाख ३४ हजार रूपये किमतीचे दुरूस्तीचे साहित्य असा २८ लाख ८४ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी (Thief) चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा

अज्ञात चोरट्यांनी केली चाेरी

याबाबत बापू बन्सी सोनवणे (वय ३५, रा. हिंगणगाव, ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. सोनवणे यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये जेसीबी खरेदी केला होता. एका गुन्ह्यात जप्त असलेला हा जेसीबी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ११ नोव्हेंबर २०२५ रोजी परत मिळाला. त्यानंतर सोनवणे यांनी १४ नोव्हेंबर रोजी जेसीबीचे काम करण्यासाठी कल्याण बायपास रस्त्यावरील एका वर्कशॉप येथे लावला होता. १९ नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते २० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वर्कशॉप मधून हा जेसीबी चोरून नेला.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार

२८ लाख ८४ हजारांच्या मुद्देमालाची चोरी(Crime)

याव्यतिरिक्त, जेसीबीमध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेले एक लाख ३४ हजार ५०० रूपये असा एकूण २८ लाख ८४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करत आहेत.