Crime : श्रीरामपुरात गावठी कट्टा, तलवार घेऊन फिरणारे दोघे पकडले

Crime : श्रीरामपुरात गावठी कट्टा, तलवार घेऊन फिरणारे दोघे पकडले

0
Crime

Crime : श्रीरामपूर : येथील तहसील कार्यालय परिसरात गावठी कट्टा (Gavathi Katta) घेवून फिरणाऱ्या २५ वर्षीय तरूणाला त्याचबरोबर संजयनगर परिसरात तलवार घेवून बसलेल्या एका संशयितास तलवारीसह श्रीरामपूर पोलिसांनी (Police) पकडले आहे. सदर आरोपीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल केला आहे. 

हे देखील वाचा: मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित; मनोज जरांगेंनी दिली माहिती

गावठी कट्टा व दोन राउंड मिळाले (Crime)


श्रीरामपूर शहर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत कळाले की, नवीन तहसील कचेरीजवळ चॉकलेटी रंगाचा शर्ट घातलेला एक इसम स्वतःकडे गावठी कट्टा बाळगून फिरत आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी याबाबत आपल्या पोलीस पथकाला तातडीने याची माहिती देवून कचेरीजवळ जाण्यास सांगितले. त्यानंतर अडीच- पावणे तीनच्या सुमारास त्याठिकाणी पोलीस गेले असता तहसील ऑफिस जवळली मदर तेरेसा चौकाजवळ एकजण दिसला असता पोलिसांनी त्याला पकडले. पकडलेला आरोपी तंजील गफार खान (वय २५, रा. फकीरवाडा, वा.नं.१, श्रीरामपूर) याची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्या कंबरेला गावठी कट्टा व दोन राउंड मिळाले. त्याची अंदाजित किंमत ३७ हजार रुपये एवढी आहे. सदर आरोपीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

नक्की वाचा: बापरे ! पंतप्रधान मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स ?

आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल (Crime)


दुसऱ्या एका घटनेत रात्री ११ च्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, संजयनगर, वा.नं.२, इदगाह मैदान परिसरात एक इसम तलवार घेवून बसला आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सदर इसमाला पकडले. तेव्हा त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी पाते असलेली तलवार आढळून आली. पकडलेल्या आरोपीचे नाव सर्फराज बाबा शेख (वय २१, रा. इदगाह मैदान परिसर, संजयनगर, श्रीरामपूर) असे असून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरील दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here