Crime | संगमनेर शहरातून २१ किलो गांजा हस्तगत; दोन आरोपी जेरबंद

मध्यरात्री सापळा रचून कारवाई

0

Crime : संगमनेर: संगमनेर शहरात पोलिसांनीअमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी २१ किलो ४९० ग्रॅम वजनाचा गांजा, तसेच एक कार असा एकूण १० लाख ९४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (Crime) केला आहे. या प्रकरणी प्रथमेश उर्फ भैय्या पोपट राऊत (रा. घुलेवाडी) आणि प्रथमेश सुरेश गोलवड (रा. शिर्डी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून जप्त केलेला गांजा हा संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी परिसरात काही दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या सुमारे १ कोटी रुपयांच्या गांजा प्रकरणाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे त्या मोठ्या कारवाईचे धागेदोरे या दोघा आरोपींशी जुळत असल्याचे संकेत मिळत आहेत.

अवश्य वाचा-  संगमनेर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच मार्गी लावणार – पालकमंत्री विखे पाटील

मध्यरात्री सापळा रचून कारवाई (Crime)

 विशेष म्हणजे, नाशिक विभाग अमली पदार्थ विरोधी पथक हे पथक अनेक दिवसांपासून या आरोपींच्या शोधात होते. मात्र, संगमनेर शहर पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून अचूक कारवाई करत मुख्य आरोपी प्रथमेश उर्फ भैय्या पोपट राऊत आणि त्याचा साथीदार प्रथमेश सुरेश गोलवड यांना अटक केली. ही कारवाई सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बावरकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सावंत तसेच पोलीस कर्मचारी बाबासाहेब सातपुते, विजय खुळे, विजय आगलावे, राहुल नागरे, अतुल उंडे, राहुल शिरसागर, लक्ष्मण खेडकर यांनी दमदार आणि नियोजनबद्ध कारवाई केली.