Crime : शेवगाव : शेवगाव येथील एका हॉटेलवर (Hotel) पोलिसांनी छापा टाकत तीन बांगलादेशी (Bangladeshi) तरुणींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी (Police) सहा जणांना ताब्यात घेतले आहे. नोकरीचे आमिष दाखवून या तरुणींना भारतात आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचा प्रकार या कारवाईत उघडकीस आला आहे.पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.
नक्की वाचा : अमेरिकेकडून भारताला रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची सूट; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
बनावट ग्राहक पाठवून खात्री
त्याच अनुषंगाने सामाजिक संस्था ‘फ्रिडम फर्म’ यांना गुप्त माहिती मिळाली की, शेवगाव–गेवराई मार्गावरील एका लॉजमध्ये काही तरुणींना ठेवून त्यांच्याकडून बेकायदेशीररीत्या वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. ही माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला. पोलीस निरीक्षक हमीद शेख यांनी पथकासह पंचांसमक्ष बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतरन त्या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान तीन पीडित तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली.
अवश्य वाचा : इंग्लंडला नमवत भारताचा फायनलमध्ये प्रवेश
इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसाय करून घेतल्याचे तपासात समोर (Crime)
या प्रकरणी कृष्णा बापू झिरपे (वय २५, रा. चापडगाव रोड, कोळगाव), प्रतिक मिलिंद रांधवने (वय २८, रा. माळीवाडा, शेवगाव), बाबासाहेब रामभाऊ अंधारे (रा. शेवगाव), अजिंक्य विठ्ठल अंधारे (रा. शिवाजीनगर, शेवगाव), अमोल पठाडे (रा. नेवासा) आणि अमर मारूती ढाकणे (रा. हसनापूर, ता. शेवगाव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपींनी एजंटमार्फत बांगलादेशातून अवैध मार्गाने मुलींना आणून त्यांना लॉजच्या खोलीत जबरदस्तीने ठेवून त्यांच्याकडून इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसाय करून घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
गुन्हा दाखल
या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधिक्षक गणेश उगले आणि एएचटीयूचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हमीद शेख, सहाय्यक फौजदार शकील शेख, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्चना काळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया रांधवण आदींच्या पथकाने केली.



