Crime : नगर : अहिल्यानगर शहरात रामनवमी (Ram Navami) व ईदच्या (Eid) पार्श्वभूमीवर शहर उपविभागात पोलिसांनी राबवलेल्या ऑल आउट व कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान (Combing Operation) मोठी कारवाई करण्यात आली असून, विविध गुन्ह्यांमध्ये हवे असलेल्या एकूण ५ व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अदखलपात्र व दाखलपात्र वॉरंटमधील ३१ आरोपींवर वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे.
नक्की वाचा : ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार
कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प हद्दीत मोहीम
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथकांनी ही मोहीम राबवली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तपासणी दरम्यान हद्दपार ५ इसम आढळले (Crime)
१८ मार्च रोजी रात्री १० वाजेपासून ते १९ मार्च रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी संशयित व फरार आरोपींची तपासणी केली. या दरम्यान हद्दपार असलेले ५ इसम आढळून आले असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.याशिवाय, अजामीनपात्र वॉरंटमधील २ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तसेच जामीनपात्र वॉरंटमधील ३१ आरोपींवरही वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.



