Crime : नगर : नगर जिल्ह्यात तिहेरी हत्याकांड (massacre) झाल्याची खळबळजनक घटना (Sensational events) घडल्याची बातमी समाेर आली आहे. या घटनेत दारुड्या नवऱ्याने पत्नीसह दाेन मुलींना जिवंत जाळल्याचा गुन्हा (Crime) उघड झाला. ही घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा या गावात घडली. या घटनने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
अवश्य वाचा : उज्जैन च्या महाकाल मंदिरात आगीचा भडका;पुजाऱ्यांसह अनेक जण होरपळले
पेट्राेल ओतून जाळले
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपळगाव लांडगा येथील सुनील लांडगे याने साेमवारी (ता. २५) सकाळी नऊ वाजता त्याची पत्नी लिलाबाई, मुलगी साक्षी (वय १४) आणि खुशी (१३ महिने) यांना घरात जिवंत जाळले. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील लिलाबाई लांडगे आणि त्यांच्या दाेन मुली घरात असताना आराेपी सुनील लांडगे यांने पेट्राेल ओतून त्यांना जिवंत जाळले आहे.
हेही पहा : एसआयटीच्या चौकशीला मी घाबरत नाही : मनोज जरांगे पाटील
जिल्ह्यात खळबळ (Crime)
चारित्र्याच्या संशयातून आराेपीने पत्नीसह दाेन मुलींना जिवंत जाळले. तिघींना जिवंत जाळल्यानंतर आराेपी सुनील लांडगे हा दारुच्या नशेत घरासमाेर असलेल्या एका झाडाखाली निवांत बसला हाेता. मी पत्नीला जाळत असताना पत्नी माझ्या पाया पडत हाेती, असंही ताे बडबडत हाेता. या घटनेनंतर पाेलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल हाेऊन पंचनामा केला आहे. या घटनेत पत्र्याची खाेलीसुद्धा जळून खाक झाली. तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.