Crime : पारनेर: सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी पतसंस्थेत कर्ज प्रकरणे (Loan Case) दाखल केलेल्या १२ कर्जदारांची मंजूर झालेली सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम परस्पर दुसऱ्या सावकाराच्या खात्यात वर्ग करून अवैध सावकारकी करत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष,व्यवस्थापक यांच्यासह ४ जणांवर पारनेर पोलीस ठाण्यात पोलीस (Police) ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.
हे देखील वाचा : तुम्ही काँग्रेस पक्ष कुठे नेऊन टाकला; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद (Crime)
सदरचा प्रकार पारनेर तालुक्यातील राजे शिवाजी बिगर शेती सहकारी पतसंस्था कान्हूर पठार या संस्थेच्या पारनेर शाखेत मे २०२३ ते १ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. या प्रकाराची तक्रार कर्जदारांनी पारनेरच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात केल्यावर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यात तथ्य आढळून आल्यावर सहकार अधिकारी श्रेणी १ तात्यासाहेब शहाजी भोसले यांनी बुधवारी (ता.३) दुपारी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली.
नक्की वाचा: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकाेर्टाचे मुदतपूर्व सुटकेचे निर्देश
कर्जदारांची फसवणूक (Crime)
तक्रारदार शिवाजी चंदर रिकामे यांच्यासह अन्य अकरा जणांनी शिरूर येथील एका सावकाराकडून ४ टक्के व्याजदराने सुमारे २ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी त्या सर्वांनी राजे शिवाजी बिगर शेती सहकारी पतसंस्था कान्हूर पठार या संस्थेच्या पारनेर शाखेत कर्ज प्रस्ताव सादर केले. यासाठीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर सर्वांचे कर्ज प्रस्ताव मंजूर झाले. मात्र, त्यांची रक्कम कर्जदारांना न देता पतसंस्थेचे चेअरमन आझाद ठुबे व मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी भालेकर यांनी कर्जाची २ कोटी रुपयांची रक्कम हंगा (ता.पारनेर) येथील सागर असोसिएटचे प्रो. प्रा. पोपट बोल्हाजी ढवळे यांच्या खात्यावर वर्ग करत या कर्जदारांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी पतसंस्थेचे अध्यक्ष आझाद ठुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी भालेकर, पोपट ढवळे, शिरूर येथील रणजीत गणेश पाचरणे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.