Crime : नगर : अरणगाव येथील मेहेरबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिची छेडछाड काढण्यात आली. तसेच पीडितेबरोबर असलेले तिचे वडील व दोन्ही भावांना रोडरोमिओंनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पीडितेने नगर तालुका पोलीस (Police) ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुमारे आठ जणांविरोधात बाललैंगिक (Child sexual) अत्याचार, विनयभंग, जीवघेणा हल्ला आदी गुन्हे (Crime) दाखल केले आहेत.
हे देखील वाचा: मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा दाखल
दोन्ही भावांना मारहाण
पीडित मुलगी काल (शुक्रवारी) सायंकाळी मेहेरबाबा समाधीचे दर्शन घेऊन कुटुंबियांसह घरी निघाली होती. त्यावेळी सात ते आठ जणांच्या जमावाने मुलीला अडवून तिची छेड काढली. पीडितेला एकाने हात धरून ओढत लज्जा उत्पन्न करणारे वर्तन केले. या प्रकाराला पीडितेचे वडील व दोन भावांनी विरोध केला असता जमावाने पीडितेच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. दोन्ही भावांना मारहाण केली.
नक्की वाचा: सैन्य दलातील नायक सानप यांना अखेरचा निरोप
या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण (Crime)
या सर्व प्रकाराचे पीडितेच्या भावांनी व्हिडिओ चित्रीकरण केले असता जमावाने त्यांचा मोबाईल फोडल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून आज पहाटे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.