Crime : नगर : जखणगाव येथे १४ वर्षे अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न (Attempted molestation of a minor girl) करण्यात आला. हिंदू कुटुंबाला अमानुषपणे मारहाण (Beating) करण्यात आली. जखणगाव येथील पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे व मारहाण करणाऱ्या (Crime) आरोपींना कठोर शासन करून तात्काळ अटक करावी. या मागणीचे निवेदन ओबीसी (OBC) व्हिजेएनटी जनमोर्चा व हिंदुत्ववादी (Hinduism) संघटनेतर्फे करण्यात आले. रक्षाबंधनच्या आधल्या रात्री (ता. १८) ही घटना घडली.
नक्की वाचा: हाके हा रिचार्जवाला माणूस : गजेंद्र दांगट
जखणगाव नागरिक व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित
संघटनांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला देण्यात आले. याप्रसंगी भाजप प्रदेश सदस्य वसंत लोढा, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, ओंकार लेंडकर, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, ऋद्रेश अंबाडे, देविदास मुदगल, अनिल निकम, मुकुल गंधे, रोहित पठारे, राजेंद्र पडोळे, संदीप शिंदे आदींसह जखणगाव येथील नागरिक व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अवश्य वाचा: रक्षाबंधन उत्साहात; शिर्डीच्या साईबाबांना तब्बल ३५ किलोची राखी अर्पण
पीडित मुलीच्या डोळ्यावर गंभीर इजा (Crime)
नगर तालुक्यातील जखणगाव येथील एका कुटुंबातील एका १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. यात पीडित मुलीच्या डोळ्यावर गंभीर इजा झाली. या संदर्भात पीडितेच्या कुटुंबातील पाच ते सहा जणांनी आरोपीच्या कुटुंबाला विचारणा करता रविवारी (ता. १८) रात्रीच्या वेळी १०.३० वाजता गावातील आरोपींनी काळे कुटुंबांना अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीमुळे पीडितेचे कुटुंबीय भयभीत झाले आहे. सरकारी दवाखान्यात पीडितेच्या कुटुंबातील जखमींवर उपचार सुरू आहेत. अशा प्रकारच्या घटना घडू नये. यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे. गावातील ओबीसी समाजातील कुटुंबावर हा मोठा अन्याय आहे. पीडित कुटुंबीयांना संरक्षण मिळावे. तसेच आरोपींना कठोर शासन करावे व तात्काळ अटक करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.