Crime Filed : बालिकाश्रम रस्त्यावर जुन्या वादातून वृद्धावर वार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime Filed : बालिकाश्रम रस्त्यावर जुन्या वादातून वृद्धावर वार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
Crime Filed : बालिकाश्रम रस्त्यावर जुन्या वादातून वृद्धावर वार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime Filed : बालिकाश्रम रस्त्यावर जुन्या वादातून वृद्धावर वार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime Filed : नगर : किरकोळ वादाचा राग मनात धरुन सत्तुराने वार केल्याची घटना बालिकाश्रम रस्त्यावरील निलक्रांती चौकाजवळील वॉशिंग सेंटर दुकानासमोर घडली आहे. या घटनेत एक वृद्ध जखमी (Injuries) झाला असून याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : कर्जत तालुका प्रशासनाने राशीन प्रकरणात सर्वसमावेशक तोडगा काढला

तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद (Crime Filed)

याबाबत दिलीप छबू पारधे (वय ६०, रा. निलक्रांती चौक, बालिकाश्रम रोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे बुधवारी (ता. २३) यश राजेंद्र मकासरे याच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात ठेवून दुसऱ्या दिवशी गुरुवार (ता.२४) रोजी दुपारी यश मकासरे, त्याचे वडील राजेंद्र रत्नाकर मकासरे आणि त्यांचा साथीदार तुषार भोसले (सर्व रा. बालिकाश्रम रोड) हे तिघेही फिर्यादी यांच्या वॉशिंग सेंटरसमोर आले. त्यांनी तुमचा पुतण्या स्वप्नील कोठे आहे? असे विचारुन वाद सुरु केला. फिर्यादी यांनी तो येथे नाही, असे सांगताच यश मकासरे याने सत्तुर काढून हातांवर वार करत जीवे मारण्याची धमकी दिली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नक्की वाचा : धुळ्यात राडा;माणिकराव कोकाटेंच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे