Crime Filed : नगर : शहरातील रामवाडी, सर्जेपुरा येथील धार्मिक स्थळी मंगळवारी (ता. २१) रात्री साडेदहाच्या सुमारास आक्षेपार्ह घोषणा देत जमावाने आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी धार्मिक स्थळाच्या (Religious Place) गेटला लाथा मारून नुकसान करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सुमारे २५ जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
घोषणा देत धार्मिक स्थळी घुसण्याचा प्रयत्न
निखील उल्हारे, विशाल ढोले, अरविंद रमेश चिप्पा, अमित साबळे, अनिकेत गायकवाड, अतुल वैरागर, संतोष यनगदुल, प्रथमेश कोटा, अविनाश साबळे, अमर भोसले, अजय विजय भोसले, गणेश डाडर (सर्व रा. रामवाडी) व त्यांच्या इतर १० ते १२ साथीदारांनी केले. निखील उल्हारे याने घोषणा देण्यास सुरुवात केली व इतरांनी त्यामागे घोषणा दिल्या. तसेच, गेटला लाथा मारून नुकसान करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने धार्मिक स्थळी घुसण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
नक्की वाचा : हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी : आयुक्त डांगे
फिर्यादीत म्हटले आहे की, (Crime filed)
याबाबत जावेद अब्बास तांबोळी (वय ५०, रा. नालबंद खुंट) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, मंगळवारी रात्री साडेदहा वाजता धार्मिक स्थळी साफसफाईचे काम करणारे कर्मचारी शेख सरदार यांनी तांबोळी यांना फोन करून घटनेची माहिती दिली. रामवाडी बाजूच्या गेटजवळ १० ते १५ लोक जमले असून ते गेटवर लाथा मारत आहेत व आक्षेपार्ह घोषणा देत आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी सांगितले. तांबोळी यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच संशयित आरोपी तेथून पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.



