Crime Filed : नगर : अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल (Slaughter of Cows) करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून सहा जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime Filed) केला आहे. त्यांच्याकडून १ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको : सुजय विखे पाटील
गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे
तोहिद नुर कुरेशी (वय -१९, रा. डावरेगल्ली, झेंडीगेट), सोहिल इकबाल कुरेशी (वय- २६,रा. सदरबाजार भिंगार, ता. जि. अहिल्यानगर), समिर शफिक कुरेशी (वय- ३३, रा. सदर बाजार, भिंगार), रिजवान महम्मदहुसैन कुरेशी (वय- ३६, रा. सदरबाजार भिंगार), वाशिफ मुन्नावर कुरेशी (रा.सुभेदार गल्ली, झेंडीगेट), कैफ मुन्नावर कुरेशी (रा.सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
छापा टाकून १ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Crime Filed)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार झेंडीगेट परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार पथकाने छापा टाकून १ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विष्णू भागवत, विशाल तनपुरे यांच्या पथकाने केली.



