Crime Filed : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव (Kamargaon) येथील किराणा दुकानदाराचे घर पाडून घरातील संसार उपयोगी वस्तू, दुकानातील माल, सोन्याचे दागिने (Gold Jewellery) आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ८ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान घडली.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल
पुण्यातील तिघांविरूध्द गुन्हा दाखल
याप्रकरणी अशोक पृथ्वीराज बाफना (वय ७४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुण्यातील तिघांविरूध्द गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे. हिरालाल भेरूदास चत्तर, प्रमोद हिरालाल चत्तर आणि महावीर हिरालाल चुत्तर (सर्व रा. महर्षीनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा : अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या : आमदार संग्राम जगताप
१ लाख ८५ हजार रूपयांचा ऐवज चाेरी (Crime Filed)
फिर्यादी अशोक बाफना यांचे कामरगाव येथे घर आणि किराणा दुकान आहे. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ते घर बंद करून गेले होते. या कालावधीत संशयित आरोपींनी बाफना यांच्या संमतीशिवाय घरात घुसून त्यांनी ५० हजार रूपये किमतीचे फ्रीज, टीव्ही, कुलर, गॅस, कपाट व भांडी, तसेच दुकानातील ५० हजार रूपयांचा किराणा माल व स्टेशनरी चोरून नेली. यासोबतच दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि २५ हजार रूपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ८५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादीच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



