Crime Filed : व्यापाऱ्याची ७० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

Crime Filed : व्यापाऱ्याची ७० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

0
Crime Filed : व्यापाऱ्याची ७० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल
Crime Filed : व्यापाऱ्याची ७० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

Crime Filed : नगर : जमीन खरीदीच्या व्यवहारात ७० लाखांची फसवणूक (Fraud) झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे. ही घटना अहिल्यानगर तालुक्यातील वडगाव गुप्ता परिसरात घडली आहे.

अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा

एकूण ७० लाखांची रक्कम स्वीकारली

या प्रकरणी बबन बाबुराव गुडगळ, दत्ता बबन गुडगळ, छबू बबन गुडगळ आणि शंकर बबन गुडगळ यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोनल सुभाष निकम (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी हे ग्रामीण भागात जमीन खरेदी-विक्री व डेव्हलपमेंटचा व्यवसाय करतात. सन २०२२ मध्ये नात्यातील बबन बाबुराव गुडगळ यांनी त्यांच्या मालकीची नवनागापूर येथील जमीन विक्रीस काढल्याचे सांगत व्यवहाराची चर्चा केली. त्या जमिनीची पाहणी करून २ कोटी १० लाख असा व्यवहार ठरला. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२२ रोजी नोटरी विसार पावती नोंदविण्यात आली. यावेळी बबन गुडगळ तसेच त्यांचे पुत्र दत्ता, छबू आणि शंकर गुडगळ हे उपस्थित होते. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार व्यवहाराच्या बदल्यात रोख आणि धनादेशाद्वारे टप्या टप्प्याने मागणी नुसार एकूण ७० लाख इतकी रक्कम गुडगळ कुटुंबाने स्वीकारली. संबंधित धनादेशाची नोंद त्यांच्या बँक खात्यात असल्याचा दावा निकम यांनी केला आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार

अतिरिक्त ५० लाखांची मागणी (Crime Filed)

दरम्यान, ही जमीन न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने दिवाणी दावा निकाली लागल्यानंतर खरेदीखत नोंदवून देण्याचे आश्वासन गुडगळ कुटुंबाने दिल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये दावा गुडगळ यांच्या बाजूने निकाली लागल्यानंतरही खरेदीखताची प्रक्रिया टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. उलट अतिरिक्त ५० लाखांची मागणी करण्यात आली.


तक्रारीनुसार २८ एप्रिल २०२५ रोजी गुडगळ कुटुंबाने कोणतीही रक्कम घेतली नसल्याचे सांगत खरेदी व्यवहार नाकारला, तसेच घरातील महिलांच्या माध्यमातून खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप निकम यांनी केला आहे. नोटरी दस्त करून आणि बँकेमार्फत रक्कम स्वीकारून खरेदीखत न देता आर्थिक फसवणूक करण्यात आली, असा आरोप तक्रारदार यांनी फिर्यादीत केला आहे.