Crime Filed : निंबळकमधील दुकानातून १५ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Crime Filed : निंबळकमधील दुकानातून १५ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

0
Crime Filed : निंबळकमधील दुकानातून १५ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Crime Filed : निंबळकमधील दुकानातून १५ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Crime Filed : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक शिवारातील दत्तमंदिर चौक परिसरात असलेल्या मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक दुकान अज्ञात चोरट्यांनी (Thief) फोडून मोबाईल, रोकडसह सुमारे १५ लाख ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) घरफोडीचा गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.

नक्की वाचा: मोठी बातमी!राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश

याबाबत नानासाहेब शिवाजी कोतकर (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली आहे. कोतकर यांचे निंबळक गावात दत्तमंदिर चौक परिसरात काळुबाई मोबाईल शॉपी अँण्ड इलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान आहे. दिवसभरातील काम संपल्यानंतर त्यांनी शुक्रवारी रात्री आठ वाजता दुकान बंद केले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप लावण्याची पट्टी तोडून दुकानात प्रवेश केला.

अवश्य वाचा : ‘साकळाई पाणी योजनेच्या कामाची सुरवात करून गावांना दुष्काळमुक्त करणार;राधाकृष्ण विखे पाटील

१५ लाख ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत (Crime Filed)

सामानाची उचकापाचक करून दुकानातील सुमारे १२ लाख रूपये किमतीचे ६५ नग अँड्रॉईड मोबाईल, सुमारे ९४ हजार रूपये किमतीचे ९० की-पॅड मोबाईल, दोन लाख ५० हजार रूपये रोख रक्कम तसेच १० हजार रूपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर असा एकूण १५ लाख ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) शिरीष वमने, सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह भेट दिली. गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. भरचौकात दुकान फोडून १५ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याने गावात खळबळ उडाली आहे.