Crime Filed : नगर : अहिल्यानगर शहरात (Ahilyanagar City) रात्रीच्यावेळी बंद दुकानाची काचेची खिडकी उघडून ८ हजार ५०० रुपये लंपास केल्याची घटना टिळक रस्त्या परिसरात घडली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : रेव्ह पार्टी म्हणजे काय?आरोप सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?
चोरीची घटना CCTV मध्ये कैद
याप्रकरणी प्रफुल्ल सुमतीलाल चोरडिया (वय ५३, रा. सुकमल बंगला, नंदनवन कॉलनी, चाणक्य चौक, बुरुडगाव रोड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे ४० वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करीत असून, दुकानाची देखरेख त्यांचे मॅनेजर संदीप करमाळकर पाहतात. २६ जुलै रोजी रात्री ८ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते.
नक्की वाचा : अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; सहा महिन्यांत ८९५ गुन्हे दाखल
ऑफिसमध्ये काचेची खिडकी उघडून आता प्रवेश (Crime Filed)
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता त्यांनी ऑफिस मधील खिडकी उघडी असल्याचे व ड्रॉवर मधील रक्कम गायब असल्याचे फिर्यादी यांना कळवले. त्यानंतर फिर्यादी हे तातडीने मंचर हून नगरला आले. त्यांनी दुकानाची पाहणी करून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता जर्किंग घातलेला एक अनोळखी इसम ऑफिसमध्ये काचेची खिडकी उघडून आता प्रवेश करून टेबलच्या ड्रॉवरमधून रोख रक्कम काढून घेत असल्याचे दिसले. त्यानंतर मंगळवारी (ता.२९) कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दिली.