Crime Filed : माळीवाड्यात हॉटेलमध्ये वीज चोरी; गुन्हा दाखल

Crime Filed : माळीवाड्यात हॉटेलमध्ये वीज चोरी; गुन्हा दाखल

0
Crime Filed : माळीवाड्यात हॉटेलमध्ये वीज चोरी; गुन्हा दाखल
Crime Filed : माळीवाड्यात हॉटेलमध्ये वीज चोरी; गुन्हा दाखल

Crime Filed : नगर : माळीवाडा परिसरातील ब्राम्हण गल्ली, बारातोटी कारंजा येथील एका हॉटेलच्या वीज मीटर (Electricity Meter) मध्ये फेरफार करून तब्बल १ लाख २३ हजार १८८ रुपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाने कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल (Crime Filed) केला आहे.

नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर

यांनी दिली फिर्याद

याबाबत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र हिरालाल राजपूत (वय ५५, रा. ठाकरेनगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली.

अवश्य वाचा : आठवीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून चाकू हल्ला!

फिर्यादीत म्हटले आहे की, (Crime Filed)

ब्राम्हण गल्ली, बारातोटी कारंजा येथील एका हॉटेल येथे चैताली बाळासाहेब बोराटे यांच्या नावे असलेल्या ग्राहक क्रमांकच्या मीटर मध्ये फेरफार करुन, मागील १२ महिन्यांपासून ५ हजार २७९ युनिट वीज चोरी करण्यात आली आहे. या वीज चोरीची एकूण किंमत १ लाख २३ हजार १८८ रुपये इतकी असल्याचे उघडकीस झाले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.