Crime filed : सराफाच्या दुकानाचे शटर फोडून ८८हजारांचे सोने-चांदीचे दागिने लंपास; गुन्हा दाखल 

Crime filed : सराफाच्या दुकानाचे शटर फोडून ८८हजारांचे सोने-चांदीचे दागिने लंपास; गुन्हा दाखल 

0
Crime filed : सराफाच्या दुकानाचे शटर फोडून ८८हजारांचे सोने-चांदीचे दागिने लंपास; गुन्हा दाखल 
Crime filed : सराफाच्या दुकानाचे शटर फोडून ८८हजारांचे सोने-चांदीचे दागिने लंपास; गुन्हा दाखल 

Crime filed : नगर : केडगाव उपनगरातील शाहुनगर बसस्टॉप येथील बालाजी ज्वेलर्स या सराफा दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी (Thieves) ८८ हजार २०० रूपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (ता. २५) रात्रीपासून ते मंगळवारी (ता.२६) पहाटे दरम्यान घडली असून, या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल (Crime filed) करण्यात आला आहे.

नक्की वाचा: पाथर्डी शहरात फ्रॉड कॉल्सचा कहर; मोबाईलवर आले शेकडो ओटीपी

सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी केला लंपास

फिर्यादी मुकेश मधुकर दहिवाळ (वय ४३, रा. कौशल्यानगरी, माधवनगर, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते शाहुनगर बसस्टॉप येथे बालाजी ज्वेलर्स या नावाने सोन्या-चांदीचे दुकान चालवतात. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले होते. मात्र दुसर्‍या दिवशी मंगळवारी पहाटे ४ वाजता त्यांचे ओळखीचे महेश धायतडक यांनी फोन करून दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती दिली. त्यानंतर दहिवाळ व इतरांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता दुकानातील काउंटरवरील दागिने, रोख रक्कम तसेच सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले.

आवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व सर्व मांस विक्री केंद्र दोन दिवस बंद

फिर्यादीत म्हटले आहे की, (Crime filed)

चोरट्यांनी सोन्याचे मोरणी, सोन्याची बाळी, चार जोड चांदीचे जोडवे, नऊ चांदीच्या अंगठ्या, आठ जोड चांदीच्या पैंजण तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ८८ हजार २०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.