Crime Filed : नगर : प्लॉट वरील ताबा सोडण्यासाठी ॲट्रॉसिटीच्या (Atrocity) गुन्ह्यात अडकविण्याची तसेच पोलीस (Police) ठाण्याच्या आवारातच अडवून हा वाद मिटवायचा असेल तर १ कोटी रूपयांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पती-पत्नी विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: नगर-पुणे रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी
प्रकाश लोंढे व उषारजनी लोंढे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गणेश हरिभाऊ गोंडाळ (वय ४७, रा. मच्छिंद्र हौसिंग सोसायटी, समाधान हॉटेल जवळ, छत्रपती संभाजीनगर रस्ता, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, त्यांचे बंधू महेश गोंडाळ हे १२ सप्टेंबर रोजी दुपारी त्यांच्या मिळकतीच्या ठिकाणी असताना प्रकाश लोंढे हे आले व त्यांनी सदर प्लॉट वरील ताबा सोडण्यासाठी ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या नावाने शिवीगाळ केली.
नक्की वाचा : सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही; निलेश लंकेंची सुजय विखेंवर टीका
पोलीस ठाण्याच्या आवारात मागितली खंडणी (Crime Filed)
त्यानंतर फिर्यादी हे तोफखाना पोलीस ठाण्यात गेले व त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. तेथून ते बाहेर पडत असताना पोलीस ठाण्याच्या आवारात प्रकाश लोंढे व त्यांची पत्नी उषारजनी लोंढे उभे होते. ते फिर्यादीला म्हणाले कशाला वाद वाढवतो, मी वकील आहे. शेवटपर्यंत तुम्हाला सुधरू देणार नाही, ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवेल. या पेक्षा वाद मिटवून टाका मला १ कोटी रूपये द्या, मी प्लॉट वरील दावा सोडतो, असे म्हणत खंडणी मागितली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.