Crime Filed : नगर : अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरील केडगाव येथील रामकृष्ण असोसिएट्स या गोडाऊनवर काम करणाऱ्या दोन युवकांवर गोडाऊन मालक व इतरांनी जातीवाचक शिवीगाळ करून हॉकी स्टिक व लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत दोन युवक जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियातून टीकेचा भडीमार
जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण
या प्रकरणी हर्षद उत्तम वाघमारे (वय २४, रा. भिंगार घासगल्ली, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या जबाबावरून अनिकेत राजेंद्र कोतकर (रा. केडगाव, अहिल्यानगर) व त्याच्या पाच साथीदारांविरूध्द जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : सावेडी उपनगरात युवकावर कोयत्याने हल्ला; सात जणांविरूध्द गुन्हा दाखल
फिर्यादीत म्हटले आहे की, (Crime Filed)
ते व इतर मजूर अनिकेत कोतकर याच्या मालकीच्या रामकृष्ण असोसिएट्स या गोडाऊनवर मजुरीचे काम करतात. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान पगाराच्या थकबाकीबाबत चर्चा करण्यासाठी सहकारी सागर अलसम बरोबर गोडाऊनवर गेले असता, तेथे अनिकेत कोतकर तसेच सुजल बनसोडे, विनायक देवकर, कार्तिक कुटे व आकाश हजारे उपस्थित होते. त्या वेळी अनिकेत कोतकर याने फिर्यादी वाघमारे याच्याशी जातीवाचक शिवीगाळ करत तुमची लायकी आहे का पगार मागायची? असे अपमानास्पद वक्तव्य केले. फिर्यादीने विरोध केल्यावर कोतकर याने हॉकीच्या दांडक्याने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.