Crime News | नगर : एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सुरु असलेल्या मावा कारखान्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून ८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत पाच आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘आता त्यांनी बंदूक टाकून मुख्य धारेत यायला हवं’; देवेंद्र फडणवीसांचे माओवाद्यांना आवाहन
संशयित आरोपींची नावे (Crime News)
शुभम दत्तात्रय हजारे (रा. केडगाव, अहिल्यानगर), मंजित कुमार विजय कुमार सिंग (वय ३८, रा. नवनागापूर, अहिल्यानगर), आकाश बाळासाहेब शिरसाठ (वय. २५, साईराज नगर, नवनागापूर), प्रशांत अशोक नवथर (वय २५, रा. पिंपरी शहाली, ता. नेवासा), महेश देविदास खराडे (वय २२, रा. जेऊर हैबती ता. नेवासा), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा – ‘पैस’ च्या दर्शनासाठी नेवासा येथे माऊली भक्तांचा महापूर
खात्रीशीर माहितीच्या आधारे छापा (Crime News)
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांना मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी येथील नवनागापूर परिसरात घराच्या छतावर पत्र्याच्या शेडमध्ये अवैध मावा कारखाना सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून ८ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई (Crime News)
ही कारवाई पोलीस अंमलदार शंकर चौधरी, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, सुनील पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, सुनील दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दीपक जाधव यांच्या पथकाने केली.