Crime News : तरूणावर कोयत्याने हल्ला; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

Crime News : तरूणावर कोयत्याने हल्ला; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

0
Crime News : तरूणावर कोयत्याने हल्ला; चौघांविरूध्द गुन्हा दाखल
Crime News : तरूणावर कोयत्याने हल्ला; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

Crime News : नगर : अहिल्यानगर एमआयडीसी भागातील एका कंपनीसमोर भरदुपारी एका तरूणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Life-threatening Attack) करून त्यांचे अपहरण (Kidnapping) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवीण ज्ञानदेव मोरे (पत्ता माहिती नाही) असे अपहृत तरूणाचे नाव आहे.

नक्की वाचा : शिर्डी जमीन व्यवहारात फसवणूक; खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

दरम्यान, याप्रकरणी अक्षय दत्तात्रय गवळी (वय २९, रा. शंभुराजेनगर, चेतना कॉलनी, नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल (Crime News) केला आहे. संजय ठोंबरे (रा. आदर्शनगर), सत्यम कासार, अलोक चारोडे (दोघे रा. अस्तगाव, ता. पारनेर) व एक अनोळखी विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अपघातानंतर प्रवीणवर कोयत्याने वार (Crime News)

मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास प्रवीण मोरे हे एमआयडीसी भागातील एका कंपनीसमोर असलेल्या पानटपरी जवळ असताना, संशयित आरोपी तेथे आले. त्यांनी प्रवीणला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहनाची जोराची धडक दिली. या अपघातानंतर संशयितांनी प्रवीणवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवीणला संशयितांनी जबरदस्तीने वाहनात टाकून पळवून नेले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.