नगर : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) एका पोलीस अधिकाऱ्यानेच स्वतःवर झाडली गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक नजन (Ashok Najan) असं त्यांचं नाव आहे. या घटनेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
नक्की वाचा : मनोज जरांगे पाटलांचा स्वतंत्र आरक्षणासाठी नकार
स्वतःवर गोळी झाडली (Crime News)
आज (ता.२०) सकाळी अंबड पोलीस ठाण्यात स्वतःच्या कॅबीनमध्ये पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली. यामुळे नाशिक पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडताच पोलिसांची मोठी धावपळ उडाली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आलं आहे. गेल्या वर्षभरापासून अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून अशोक नजन काम करत होते. अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचे असलेले नजन यांनी आपल्या कामातून वचक निर्माण केला होता.
अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्रीरापुरात मिरवणूक
पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या (Crime News)
पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी पोलीस ठाण्यात स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधूनच गोळी झाडून घेतली. सकाळी नेहमीप्रमाणे ते ड्युटीवर हजर झाले होते. आपल्या सहकाऱ्यांशी बोलून ते त्यांच्या केबिनमध्ये गेले. त्यांच्या केबिनमध्ये हजेरी बुक घेऊन गेलेला एका कर्मचाऱ्याला ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यानंतर ही घटना समोर आली. ही घटना कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अशोक नजन यांनी आत्महत्या का केली, हे समजू शकलेलं नाही. याशिवाय त्यांच्याकडे कोणतीही सुसाईट नोटही मिळालेली नाही, अशी महिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.