Crime News Update | नगर : नाशिक जिल्ह्यातील संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सध्या नगरमध्ये (Ahmednagar) आली आहे. ही पालखी नगरमध्ये दाखल होत असताना मंगळवारी (ता. २) दुपारी दोन वाजेच्या सुमारास कीर्तनकार पुंडलिक महाराज थेटे यांना एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून संपर्क साधत जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला. हा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन
कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (Crime)
संत निवृत्तीनाथ महाराज पालखी त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथून निघाली. त्यावेळी काही पत्रकारांनी थेटे महाराज यांना पालखी सोहळ्यातील राजकीय हस्तक्षेपावर प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना थेटे महाराज यांनी पालखी सोहळ्यात राजकीय हस्तक्षेप नको, असे वक्तव्य केले होते. संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी मंगळवारी (ता. २) नगर शहरात येत असताना थेटे महाराज यांना मोबाईलवर एकाने संपर्क केला. तो म्हणाला की, तुम्ही राजकीय वक्तव्य का केले. मी एका राजकीय पक्षाचा प्रतिनिधी आहे. माझ्या पक्षातील नगर शहरातील कार्यकर्ते तुमच्या तोंडाला काळे फासतील. तुम्ही दोन लाख रुपये द्या अन्यथा तुम्हाला जीवे मारू, अशी धमकी दिल्याचे थेटे महाराज यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
नक्की वाचा : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू
आरोपी नाशिकमधील (Crime)
थेटे महाराज यांना धमकी मिळताच संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी ट्रस्टच्या विश्वस्तांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपीवर करवाई करण्याची मागणी केली. तसेच थेटे महाराज यांना घेऊन काही विश्वस्त काल (ता. ३) कोतवाली पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खंडणी मागणे व जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास सुरू केला आहे. या पुराव्यांच्या आधारे आरोपी हा नाशिक जिल्ह्यातील असून तो थेटे महाराज यांच्या संपर्कातील असल्याचे प्रथम दर्शनी तपासात समोर आल्याचे समजते.