Crime Registered : रास्ता रोको आंदोलनातील नऊ आंदोलकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल

Crime Registered : रास्ता रोको आंदोलनातील नऊ आंदोलकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल

0
Crime Registered : रास्ता रोको आंदोलनातील नऊ आंदोलकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल
Crime Registered : रास्ता रोको आंदोलनातील नऊ आंदोलकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल

Crime Registered : राहुरी: नगर-मनमाड रस्त्यावर अनेकांचे बळी जात असून या रस्त्याचे काम तातडीने होऊन अवजड वाहतूक वळवावी, या मागणीसाठी नगर-मनमाड रस्ता (Nagar-Manmad Road) दुरुस्ती कृती समितीने काल (ता.१०) राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन (Road Blockade Protest) केले. या आंदोलनातील नऊ आंदोलकांवर राहुरी पोलिसांत गुन्हे दाखल (Crime Registered) करण्यात आले आहेत.

नक्की वाचा: आईने कचरा टाकायला सांगितल्याने मुलगा गेला घर सोडून

फिर्यादीत म्हंटले आहे की,

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हंटले की, १० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते  १२ या वेळेत राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० या ठिकाणी वसंत कुंडलीक कदम, अनिल रामभाऊ येवले, प्रशांत शिवाजी मुसमाडे, प्रशांत रामभाऊ काळे, संदीप बाबुराव कोठुळे, गोविंद खावडे, सुनील पंडीतराव विश्वासराव, आदिनाथ रभाजी कराळे, बाळासाहेब लोखंडे यांनी समाज उद्दिष्टासाठी बेकायदेशीर जमाव जमविला.

अवश्य वाचा: १२७ कोटीची कामे अहिल्यानगर महापालिका करतेय उध्वस्त’

प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग (Crime Registered)

जमावात सामील होवून रस्त्यावर थांबून राहून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे वाहन अनाधिकाराने गैरपणे थांबवले. तसेच सार्वजनिक उपद्रव करुन रस्त्याने जाणारे-येणारे दोन्ही बाजूंची वाहने थांबवून ठेवली. तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये २७ ऑगस्ट २०२५ ते १० सप्टेंबर या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम २७(१००३) वे प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग केला म्हणून वसंत कुंडलीक कदम, अनिल रामभाऊ येवले, प्रशांत शिवाजी मुसमाडे, प्रशांत रामभाऊ काळे, संदिप बाबुराव कोठुळे, गोविंद खावडे, सुनिल पंडीतराव विश्वासराव, आदिनाथ रभाजी कराळे, बाळासाहेब लोखंडे आदी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके करीत आहेत.