Crime Registered : नगर : दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलावर (वय १७) लोखंडी कोयत्याने हल्ला (Attack) केल्याची घटना केडगाव येथील तिरंगा चौक परिसरात घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) करण गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही, रा. तिरंगा चौक, केडगाव, अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांचा जामीन अर्ज मागे
किरकोळ कारणावरून वाद
तिरंगा चौक येथे राहणाऱ्या जखमी अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. दोन दिवसांपूर्वी फिर्यादीचा मित्र व करण गायकवाड यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्या वेळी फिर्यादी घटनास्थळी उपस्थित होता.
नक्की वाचा : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
फिर्यादीच्या पोटरीवर लोखंडी कोयत्याने वार (Crime Registered)
दरम्यान, सोमवारी (ता. २७) दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी हा आपल्या मित्रासोबत तिरंगा चौक, केडगाव येथील एका किराणा दुकानासमोर गप्पा मारत उभा असताना करण गायकवाड हा तेथे आला. त्याने मागून येऊन फिर्यादीच्या पोटरीवर लोखंडी कोयत्याने वार करून जखमी केले. हल्ल्यानंतर फिर्यादीने करणला कारण विचारले असता, त्याने मागील कारणातून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



