Crime Registered : नगर : अहिल्यानगर शहरातील भुतकरवाडी, भिंगारदिवे मळा परिसरात एका रूग्णसेविकेचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी (Thief) दोन लाख २३ हजार ३२० रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उमा गजानन गव्हाणे (वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) घरफोडीचा गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे.
दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत
फिर्यादी ह्या भिंगारदिवे मळ्यात त्यांच्या घरी राहतात. मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता त्यांनी घर बंद करून हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर गेल्या होत्या. तर त्यांची आई दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आजारी भावाकडे लक्ष देण्याकरीता गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २९) सकाळी साडेनऊ वाजता फिर्यादी ड्यूटीवरून परत आल्या असता, त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. कडीचा भागही अर्धवट तुटलेला होता. त्यांनी घरात प्रवेश केला असता, घरातील कपाट आणि इतर सामानाची मोठी उचकापाचक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना तत्काळ घरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने तोफखाना पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही केले पाचारण (Crime Registered)
माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. चोरट्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले सोने असा २ लाख २३ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



