Crime Registered : शालेय पोषण आहाराचे गोडाऊन फोडून वाहनाची तोडफोड; गुन्हा दाखल

Crime Registered : शालेय पोषण आहाराचे गोडाऊन फोडून वाहनाची तोडफोड; गुन्हा दाखल

0
Crime Registered : शालेय पोषण आहाराचे गोडाऊन फोडून वाहनाची तोडफोड; गुन्हा दाखल
Crime Registered : शालेय पोषण आहाराचे गोडाऊन फोडून वाहनाची तोडफोड; गुन्हा दाखल

Crime Registered : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात शालेय पोषण आहार (School Nutrition Program) पुरवणाऱ्या वितरकाच्या गोडाऊन फोडून आहार वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे. कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून एका बडतर्फ सुपरवायझरने पाच ते सहा साथीदारांसह हा प्रकार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दत्ता गोरख सोनवणे (रा. अमरधामच्या पाठीमागे, कल्याण रस्ता, अहिल्यानगर) याच्यासह त्याच्या ५ अनोळखी साथीदारांचा आरोपीत समावेश आहे.

नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

सुमारे १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान

याबाबत सागर मोहन पाटील (वय ३२, रा. जय मल्हारनगर, नवनागापूर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, बोल्हेगाव येथील क्रोनोस फिटनेसच्या पाठीमागे आहारचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये आहार वाहतूक करणाऱ्या वाहन लावण्यात आले होते. १ फेब्रुवारीला रात्री १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास संशयिताने ६ वाहनांच्या काचा फोडून सुमारे १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान केले. त्यांच्याकडे या पूर्वी आरोपी दत्ता गोरख सोनवणे हा सुपरवायझर म्हणून कामाला होता. मात्र तो कामात दुर्लक्ष करत, वाहनचालक व गोडावून मधील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत असे, विनाकारण कोणालाही पैसे मागत असे त्यामुळे फिर्यादी पाटील यांनी त्यास कामातील हलगर्जीपणामुळे नोव्हेंबर २०२५ मध्ये कामावरून काढले होते.

हे देखील वाचा: बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय होतं?, अजित पवार सत्ता सोडणार की, शरद पवार भाजपसोबत जाणार?

कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी (Crime Registered)

कामावर तडकाफडकी काढून टाकल्याचा राग मनात धरून मला १ लाख रुपये दे नाहीतर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी देऊन खंडणी मागत होता. १ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० च्या सुमारास दत्ता सोनवणे याने पाच अनोळखी साथीदारांसह गोडाऊनवर येऊन धुमाकूळ घातला. तेथील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तीन पिकअप, एक मिनी ट्रक आणि दोन टेम्पोची दगडफेक करून मोठी तोडफोड केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.