
Crime registered against Groom and DJ operator : नगर: लग्नाच्या वरतीत डीजे लावणे नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येथे बोल्हेगाव येथे कर्ण कर्कश आवाजात डीजे वाजवल्या प्रकरणे तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) नवरदेव व डीजे चालकावर गुन्हा दाखल (Crime registered against Groom and DJ operator) करण्यात आला आहे. संदेश राजेंद्र गायकवाड (रा. रेणुकानगर बोल्हेगाव ता. जि. अहिल्यानगर), गणेश बाळासाहेब कोलते (रा. बोल्हेगाव ता.जि.अहिल्यानगर), असे गुन्हा दाखल (Crime Registered) झालेल्या संशयीतांची नावे आहेत.
नक्की वाचा : भारताने रचला इतिहास; तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद
कर्ण कर्कश आवाजात वाजवला डि.जे.
कोल्हेगाव येथील आंबेडकर चौकात (ता. ७) रोजी रात्री जोर जोरात कर्ण कर्कश आवाजात डि.जे. वाजत असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी नाईट पेट्रोलिंगचे अधिकारी अंमलदार यांना घटनेची माहिती दिली त्यानुसार पथकाने साडेअकरा वाजेच्या दरम्यान संदेश राजेंद्र गायकवाड याने लग्नाची वरात काढण्यासाठी डि.जे. लावला असल्याची माहिती प्राप्त झाली. वरात काढणारा संदेश गायकवाड याच्याकडे डि.जे. /वादय वाजवण्याचे परवानगी बाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे समोर आले.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
विविध कलमान्वये गुन्हा दाखल (Crime registered against Groom and DJ operator)
जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे जमाबंदीचे आदेशाचे उल्लंघन केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी क्षेपकांबाबत घालुन दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याने ध्वनी प्रदूषण व सह पर्यावरण संरक्षण अधिनियम अनुसार तोफना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अहिल्या नगर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांच्या पथकाने केली आहे.


