Criminal : नगर : अहिल्यानगर शहरसह एमआयडीसी परिसरात दहशत करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर (Criminal) एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी तसे आदेश पारित केले असून एमपीडीए (MPDA) कायद्याअंतगर्त आरोपीस एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहेत.
नक्की वाचा : पुण्यातील धनकवडीत २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; २० ते २५ वाहनांची तोडफोड
गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग
संतोष रघुनाथ धोत्रे (वय २७, रा. दावल मलीक चौक, नागापुर, ता. जि.अहिल्यानगर), असे स्थानबध्द करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी संतोष रघुनाथ धोत्रे याने एमआयडीसी व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत त्याच्या साथीदारांसह दरोडा, जबरी चोरी करणे, जबरी चोरीचा प्रयत्न करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन अग्नीशस्त्रासह व घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत करत होता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बाधीत झाली होती.
अवश्य वाचा : सुवर्णपदक विजेता देवदत्तने साधला I❤️नगरशी खास संवाद…
आरोपीस एक वर्षांकरिता केले स्थानबद्ध (Criminal)
सराईत गुन्हेगार संतोष धोत्रे याच्या समाज विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधक व हद्दपारीची कारवाई अपुऱ्या व कुचकामी ठरत होत्या. त्याचे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी एमपीडीए कायदयान्वये प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकारी अमोल भारती व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना सादर केला. या प्रस्तावाची सोमनाथ घार्गे यांनी बारकाईने पडताळणी करुन प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांना सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी एमपीडीए कायद्यान्वे कारवाई करून आरोपीस एक वर्षांकरिता स्थानबद्ध केले आहे.