Criminal : गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी जामखेड पोलीसांकडून गुंड अक्षय मोरेची शहरात धिंड

Criminal : गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी जामखेड पोलीसांकडून गुंड अक्षय मोरेची शहरात धिंड

0
Criminal : गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी जामखेड पोलीसांकडून गुंड अक्षय मोरेची शहरात धिंड
Criminal : गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी जामखेड पोलीसांकडून गुंड अक्षय मोरेची शहरात धिंड

Criminal : नगर : विविध गुन्हे दाखल असलेल्या तसेच हॉटेल न्यु कावेरी वरील गोळीबार प्रकरणातील आरोपी (Criminal) अक्षय उर्फ चिंग्या मोरे याला अटक (Arrested) केली आहे. त्या चिंग्याची जामखेड शहरात रस्त्यावरुन धिंड काढण्यात आली. आरोपी विरोधात खून(Murder) , खुनाचा प्रयत्न, मारहाण, दंगल, दरोडा, खंडणी तसेच आर्म्स अँक्ट अंतर्गत असे मिळून १० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.

नक्की वाचा : बारडगावचा तरुण बनला आयआरएस अधिकारी; दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण

साथीदारांच्या मदतीने पिस्तुलातून गोळीबार

जामखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांनान मध्ये वाढ होताना दिसुन येत आहे. शहरात स्वतः ला भाई म्हणवून घेणाऱ्यांनी जामखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. याच आनुशंगाने जामखेड शहरात स्वतःला भाई समजणाऱ्या अक्षय उर्फ चिम्या मोरे यांची शहरातुन वरात काढली. अक्षय उर्फ चिंग्या मोरे याने मागिल महीन्यात बीड रोडवरील एका हॉटेलवर इतर साथीदारांच्या मदतीने पिस्तुलातून गोळीबार करून फिर्यादीस जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच हॉटेलमधील साहित्य आणि चारचाकी गाडीची तोडफोड करण्यात आली होती.याप्रकरणी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

चिंग्या मोरेची शहरातून धिंड काढली (Criminal)

पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सहायक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव, उपनिरीक्षक किशोर गावडे, जितेंद्र सरोदे, आकाश शेवाळे, गणेश भागडे, गणेश काळाणे, कुलदीप घोळवे, यांच्या पथकाने कुख्यात गुंड चिंग्या मोरेची शहरातून धिंड काढली. खाकीची दहशत आणि दरारा काय असतो हेच आता या कारवाईतून जामखेड पोलिसांनी दाखवून दिले आहे.