Criminal : श्रीरामपूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी (Criminal) हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. गल्लीबोळातुन उदयास येऊ लागलेल्या ‘भाई व दादा’ यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी आपला दंडुका उगारला आणि पोलीस ॲक्शन मोडमध्ये (Action mode) आले. अशाच एका सराईत आरोपीची श्रीरामपूर शहर पोलिसांनी (Srirampur City Police) धिंड काढली आहे.
नक्की वाचा : ‘मुंबईत बॉम्बस्फोट होणार’ अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल
गुन्हा दाखल
याबाबत अधिक माहिती अशी की, २२ मार्चला सराईत गुन्हेगार सरफराज बाबा शेख हा श्रीरामपूर शहरातील बिफ मार्केट येथे हातात गावठी कट्टा घेऊन दहशत निर्माण करत होता. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता सर्फराज शेख हा ईदगाह मैदान येथे दिसून आला. त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आले. या घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
डोक्यावर कोयत्याने वार (Criminal)
यामध्ये संशयित आरोपी सर्फराज बाबा शेख यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा साबीर शब्बीर कुरेशी याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, संध्याकाळच्या सुमारास तो बिफ मार्केट श्रीरामपूर येथे त्याच्या कारने जात असताना सरफराज बाबा शेख, इरफान मैनुद्दीन शेख, लुकमान इसाक शहा, राहुल सोनवणे यांनी त्याची कार अडवून, कोयत्याचा धाक दाखवू, पन्नास हजार रुपयाच्या खंडणीची मागणी केली. त्याने खंडणी देण्यास नकार दिला असता इरफान मैनुद्दीन शेख याने त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला पण साबीर यांनी तो वार चुकवला. त्यावेळी इतर आरोपींनीही त्याला मारहाण केली.
पोलिसांच्या या कृतीचे सर्वसामान्य नागरिकांंमधून स्वागत
या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सध्या सर्फराज शेख याला अटक केली आहे व तो पोलीस कोठडी मध्ये आहे. सर्फराज शेखवर सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून नागरिकांमध्ये त्याची दहशत आहे. त्याची दहशत मोडून काढण्यासाठी शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ज्या भागात त्याची दहशत आहे त्याच भागात त्याची धिंड काढली. पोलिसांच्या या कृतीचे सर्वसामान्य नागरिकांंमधून स्वागत केले जात आहे.



