Criminal Action : विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स लावणाऱ्यांवर महापालिका फौजदारी कारवाई करणार

Criminal Action : विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स लावणाऱ्यांवर महापालिका फौजदारी कारवाई करणार

0
Criminal Action : विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स लावणाऱ्यांवर महापालिका फौजदारी कारवाई करणार
Criminal Action : विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स लावणाऱ्यांवर महापालिका फौजदारी कारवाई करणार

Criminal Action : नगर : शहरात विनापरवाना भिंतीवर, सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स (Posters, Banners) लावून विद्रुपीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्वच्छता मोहिमेत (Cleanliness Campaign) ही बाब समोर आली होती. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी स्वतःहून असे पोस्टर्स काढून घेतले. आता विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई (Criminal Action) करण्याचे आदेश त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार शहर प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी उड्डाणपुलाच्या खांबांवर पोस्टर लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

पोस्टर्स लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पंचनामा

अहिल्यानगर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान राबविले. यावेळी माळीवाडा बस स्थानक परिसरातील पुलाखालील खांबांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील चित्र रेखाटलेले असलेल्या ठिकाणी आर्य करिअर अॅकडमी पोलीस भरती स्पेशल बॅच संगमनेर यांच्या जाहिरातीचे पोस्टर लावल्याचे समोर आले. सुनील खंडेराव फंटागरे (रा. आर्य रेसिडेंन्शियल ब्रँच, सुधीर हॉटेल मागे, सायखिंडी फाटा, संगमनेर) यांच्यामार्फत हे पोस्टर्स विनापरवाना लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पंचनामा करण्यात आला. त्यानुसार  सुनील खंडेराव फटांगरे यांच्याविरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : हिंदू धर्म विचाराची सत्ता महापालिकेवर बसविणार : संग्राम जगताप

विद्रुपीकरण करणाऱ्यांवर यापुढे फौजदारी कारवाई (Criminal Action)

विनापरवाना सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करू नये. अशा पद्धतीने विद्रुपीकरण करणाऱ्यांवर यापुढे फौजदारी कारवाई केली जाणार आहे. सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जाहिरात कंपन्यांनीही याची खबरदारी घ्यावी. विद्रुपीकरण केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.