Crop Insurance : नगर : यंदा रब्बी हंगामात आजअखेर ३ लाख ६२ हजार ७४० हेक्टर क्षेत्राचा शेतकर्यांनी (farmer) एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) उतरवला आहे. नगर जिल्ह्यातील २ लाख ९४ हजार ९२४ शेतकर्यांनी सरकारच्या विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. यात ६ लाख ४४ हजार ४४० कर्जदार, तर ११ हजार ५१४ बिगर कर्जदार अशा प्रकारे सुमारे ६ लाख ५० हजार शेतकर्यांचे विमा अर्ज आले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून (Department of Agriculture) देण्यात आली.
हे देखील वाचा : कालव्यांची कामे रखडवून कोणती ‘निर्मिती’ साध्य करायची होती : राधाकृष्ण विखे पाटील
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा रब्बी हंगामातील पिकांसाठी विम्याचे कवच घेण्याकडे शेतकर्यांचा कल अधिक असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांना २ लाख ९४ हजार शेतकर्यांनी विमा संरक्षण घेतले आहे. ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आणि उन्हाळी भूईमूग या पिकांची ३ लाख ६२ हजार ७४० हेक्टवरील पिकाचा विमा उतरवलेला आहे. शेतकर्यांनी काढलेल्या विम्याची संरक्षित रक्कम ही २ हजार ५८ कोटीची आहे.
अवश्य वाचा : कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी प्रशासनाची बैठक
तालुकानिहाय पीक विमा काढलेल्या पिकांचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
नगर- २२ हजार ३०९.
पारनेर- ४१ हजार १५५.
नेवासे – ३४ हजार ९८९.
कोपरगाव- २९ हजार २२७.
कर्जत- २७ हजार ४९०.
जामखेड- ३६ हजार ८८६.
अकोले ९ हजार १३१.
पाथर्डी- २३ हजार ६२७.
राहाता- २७ हजार ७३६.
राहुरी- १९ हजार ३०१.
संगमनेर- ३२ हजार ७०४.
शेवगाव- २३ हजार ४३०.
श्रीगोंदे- १७ हजार ४८१.
श्रीरामपूर १७ हजार २७४