Crop Insurance : पीक विम्याची रक्कम न देणाऱ्या कंपनीला टाळे ठोकणार

Crop Insurance : पीक विम्याची रक्कम न देणाऱ्या कंपनीला टाळे ठोकणार

0
Crop Insurance : पीक विम्याची रक्कम न देणाऱ्या कंपनीला टाळे ठोकणार
Crop Insurance : पीक विम्याची रक्कम न देणाऱ्या कंपनीला टाळे ठोकणार

Crop Insurance : नगर : शेतकऱ्यांना पीक विम्याची (Crop Insurance) हक्काची रक्कम देण्यास ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी टाळाटाळ करत आहे. राज्य सरकार (State Govt) व विमा कंपनी एक दुसऱ्यावर जवाबदारी ढकलत आहे. फक्त नगर जिल्ह्यातील लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांची ११०० कोटी पेक्षा जास्त रक्कम अडकून पडली आहे. विमा कंपनी व राज्य शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी व तातडीने विमा रक्कम अदा करावी, यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanvat) यांनी दिली.

नक्की वाचा : नवाब मलिक यांना कोर्टाचा दिलासा;वेेद्यकीय जामीन मंजूर

अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाहीत

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२३- २४ चे खरीप व रब्बी हंगाम पिकांचे पीकविमा नुकसानभरपाई २० जुलैपर्यंत खात्यावर जमा करण्याचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित यांनी २० जून रोजी सांगितले. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय नगर येथे जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी लेखी दिले होते. परंतु, अद्याप नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाहीत, अशा तक्रारी येत आहेत.

अवश्य वाचा : नगरमध्ये १२ ऑगस्ट रोजी धडकणार मराठ्यांचे वादळ; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सुरू

अन्यथा टाळे ठोकण्याचे आंदोलन (Crop Insurance)

३१ जुलैपर्यंत पैसे खात्यावर जमा करण्यात यावेत, अन्यथा १ ऑगस्ट रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे पुण्यातील मुख्य कार्यालय येथे टाळे ठोकण्याचे आंदोलन करून न्याय मागण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असे निवेदन स्वतंत्र भारत पक्ष , शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीकडून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित यांना पाठविण्यात आले आहे. निवेदन स्वतंत्र भारत पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, शेतकरी संघटना महिला आघाडीच्या सुनीता वानखेडे यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here