Crop Insurance : नगर : ‘सर्वसमावेशक पीक योजने’अंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाई पोटी राज्य शासनाने (State Govt) पीक विम्याची (Crop Insurance) रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे नगरसह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई १९२७ कोटी रुपये लवकरच मिळतील, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली.
नक्की वाचा : भाऊबीजेलाही बहिणींना मिळणार ओवाळणी;अजित पवारांचा वादा
१९२७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप
पीक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते. म्हणजेच ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या ११० टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे. त्या ठिकाणी ११० टक्के पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते. या तत्त्वानुसार खरीप हंगाम २०२३ मधील मंजूर ७,६२१ कोटी रुपये पैकी विमा कंपनी मार्फत ५४६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आले आहे. तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी १९२७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होती. ही मंजूर रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असून याबाबत ३० सप्टेंबर २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
अवश्य वाचा : ‘राज्यातील सध्याचे सरकार हे बैलपुत्र,त्यांची बुद्धीही बैलाचीच’-संजय राऊत
‘या’ सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ (Crop Insurance)
नगर – ७१३ कोटी,
नाशिक – ६५६ कोटी,
जळगाव -४७० कोटी,
सोलापूर -२.६६ कोटी
सातारा – २७.७३ कोटी
चंद्रपूर – ५८.९० कोटी