CSK New Captain:मोठी बातमी! मराठमोळा ऋतुराज गायकवाड चेन्नईचा नवा कर्णधार

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. एमएस धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

0
CSK New Captain
CSK New Captain

नगर : आयपीएलच्या (IPL 2024) सामने सुरु होण्यापूर्वी चेन्नई संघाकडून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. एमएस धोनीनं (MS Dhoni) कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे यंदा चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाड सांभाळणार आहे.

नक्की वाचा : उद्यापासून रंगणार आयपीएलचा रणसंग्राम;चेन्नईत’हे’दोन संघ भिडणार

ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपदाची मोठी जबाबदारी (CSK New Captain)

आयपीएलच्या १७ व्या हंगामाला उद्यापासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या आगामी हंगामात सीएसकेचा कर्णधार नसणार आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपदाची मोठी जबाबदारी असेल. सलामीवीर ऋतुराज गायकवाड प्रथमच आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या भूमिकेत दिसणार आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आयपीएलचे पाच किताब जिंकले आहेत. मागील हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला नमवून धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची किमया साधली.

यंदा आयपीएलनंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे, शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल नेमकी कुठे खेळवायची हादेखील प्रश्न होता. पण, याचे उत्तर मिळाले आहे. आयपीएल २०२४ ला २२ मार्चपासून सुरू होणार आहे.आयपीएलच्या पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांनंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

हेही पहा : भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय?; ‘शिवप्रतिष्ठान’च्या धारकऱ्यांचा सवाल 

चेन्नईच्या ताफ्यात कोण ?


अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हन कॉनवे, महीश  महीश थीकशाना, मथीशा पथिराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेख  रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, शार्दूल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, रचिन रविंद्र, अविनाश रॉय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here