CSK vs GT : शुभमन गिल अन् साई सुदर्शननी झळकावली शतके; गुजरातने  केला चेन्नईचा पराभव

आयपीएल २०२४ च्या रणसंग्रामात रंगत भरत गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्स वर ३५ धावांनी विजय मिळवला आहे.

0
csk vs gt
csk vs gt

नगर : आयपीएल २०२४ च्या रणसंग्रामात रंगत भरत गुजरात टायटन्सने (GT) चेन्नई सुपर किंग्स वर (CSK) ३५ धावांनी विजय मिळवला आहे. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) आणि साई सुदर्शन (Sai Sudarshan) यांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या सामन्यात साई सुदर्शनने ५१ चेंडूत १०३ धावांची खेळी केली तर शुभमन गिलने १०४ धावांची खेळी केली. धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई फक्त १९६ धावाच करू शकली.

चेन्नईची सुरुवात अधिक खराब झाली. चेन्नईने १० धावांत तब्बल ३ विकेट गमावल्या. मात्र, डॅरिल मिचेल आणि मोईन अली यांच्यात १०९ धावांची भागीदारी झाली. मिचेलने ३४ चेंडूत ६३ धावा केल्या, ज्यात त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. तर अलीने ३६ चेंडूत ५६ धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने केवळ ४ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र हे दोघेही संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत

नक्की वाचा : ११ वर्षांनंतर दाभोळकर प्रकरणाचा निकाल; दोन आरोपींना जन्मठेप, तर तिघे निर्दोष

राशिद खानने सामना फिरवला (CSK vs GT)

शेवटच्या ३ षटकात चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी ६४ धावांची गरज होती. राशिद खान १८ व्या षटकात गोलंदाजी करायला आला. त्याने आपल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाला झेलबाद केले. जडेजाने १० चेंडूत १८ धावा केल्या. मिचेल सँटनर ही षटकाच्या पाचव्या चेंडूवर शून्य धावांवर बाद झाला. महेंद्रसिंह धोनीला देखील दोन  षटकात ६२ धावा करणे अशक्य होते. या दोन  विकेट्ससह राशिद खानने गुजरातचा  विजय जवळपास निश्चित केला होता.

अवश्य वाचा : ‘मराठा एक झाल्याने पंतप्रधान मोदी गोधड्या घेऊन महाराष्ट्रात मुक्कामी’- मनोज जरांगे

शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांची शतकी खेळी (CSK vs GT)

गुजरात टायटन्ससाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोन्ही सलामीवीरांनी शतकी खेळी खेळली. गिलने ५५  चेंडूत १०४ धावा केल्य, ज्यामध्ये  त्याने ९ चौकार आणि ६ षटकार मारले. दुसरीकडे, सुदर्शनने ५१ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि सात षटकार आले. गिल-सुदर्शन ही आयपीएलच्या इतिहासात सामन्याच्या एका डावात शतके झळकावणारी तिसरी जोडी ठरली.. याशिवाय गिल आणि सुदर्शन यांनी आयपीएलच्या इतिहासात पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. गिल आणि सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी केली. यादी २०२२ मध्ये क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here