नगर : आयपीएल (IPL 2024) मध्ये आज सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात होणार आहे. आजचा सातवा सामना चेन्नईमधील एम.ए. चिदंबरम स्टेडियम पार पडणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे गेल्या दोन हंगामांतील विजेते संघ आहेत. ते आज आमने सामने येणारआहेत. यावेळी ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल या नव्या कर्णधारांची कसोटी लागणार आहे.
नक्की वाचा : घरच्या मैदानावर आरसीबीचा पंजाबवर विजय;दिनेश कार्तिक ठरला गेमचेंजर
चेन्नई आणि गुजरातच्या नव्या कर्णधारांचा लागणार कस (CSK vs GT)
आयपीएलच्या यंदाच्या हंगामापूर्वी दोन्ही संघांनी नवे कर्णधार निवडले आहे. हार्दिक पांड्या मुंबईकडे परतल्याने गुजरात संघाचे नेतृत्व गिलकडे आले आहे. दुसरीकडे, यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्याच्या २४ तासांपूर्वी महेंद्रसिंह धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडताना आपला उत्तराधिकारी म्हणून ऋतुराजला निवडले. या दोनही नव्या कर्णधारांना आपापले पहिले सामने जिंकण्यात यश आले.
अवश्य वाचा : गुजरातच्या मैदानावर मुंबईचा पराभव;शुभमन गिलची विजयी सुरवात
चेन्नई समोर गुजरातचे तगडे आव्हान (CSK vs GT)
चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघांमधील खेळाडू हे चांगली खेळी करणारे आहेत. त्यामुळे तगडया प्रतिस्पर्धीला रोखणे हे दोन्ही नव्या कर्णधारांसमोरील आव्हान असेल. २४ वर्षीय गिल यंदाच्या ‘आयपीएल’मधील सर्वात युवा कर्णधार आहे. चेन्नईचा संघ हा सामना घरच्या मैदानावर खेळणार असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. चेन्नईने सलामीचा सामना आपल्या मैदानावर खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला नमवले होते. तर गुजरातने मुंबई इंडियन्सला पराभूत करत यंदाच्या हंगामाची विजयी सुरुवात केली. आता कामगिरीत सातत्य राखत गेल्या हंगामाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेड करण्याचा गुजरातचा प्रयत्न असेल. आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत टॉपवर जाणार आहे.